भोसरीतील सद्गुरुनगरला पाण्याची टाकी कोसळून पाच ठार

0
143

भोसरी, दि. 24 (पीसीबी) : पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. टाकीच्या ढीगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातील दोन ते तीन दगावले असण्याची भीती ही व्यक्त केली जात आहे. भोसरीच्या सद्गुरू नगरमध्ये ही घटना आज(गुरूवारी) सकाळी घडली आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर अधिकची माहिती समोर येईल.

पिंपरी चिंचवड येथे भोसरी सद्गुरूनगर येथे पाण्याची टाकी कोसळल्याने ही भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 3 ते 4 बिगारी कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य, अँब्युलन्स तसेच अग्निशमन दलाचे जवान, बचाव पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. याठिकाणी मोठी गर्दी जमली आहे.