भोसरी, दि. ३० – शिक्षण घ्यायचेच अशी जिद्द ठेवत यास्मिन आयुंब मुंडे या महिलेने वयाच्या ४३ व्या वर्षी दहावीचे शिक्षण पूर्ण केले. आता यापुढेही १२ वी ची परिक्षा देणार आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण करण्याचा त्यांचा निग्रह आहे. परिस्थितीशी झगडत शिक्षण घेणाऱ्या यास्मिन मुंढे यांचे भोसरी परिसरात कौतुक होते आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियांका बारसे यांच्या सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.
भोसरी येथील कै,सु. बारसे माध्यमिक विद्यालयात १७ नंबरचा फॉर्म भरून यास्मिन मुंढे यांनी तब्बल ६० टक्के गूण प्राप्त मिळविले. वयाच्या २८ व्या वर्षी काही कारणाने त्यांचे शिक्षण खंडीत झाले होते. संधी मिळताच त्यांनी अभ्यास सुरू केला आणि सर्व जबाबदारी सांभाळून त्यांनी
दहावीची परिक्षा दिली. सर्व शिक्षकांच्या मुख्याध्यापक मार्गदर्शन मिळाल्याने त्यांनी हा पल्ला गाठला.