भोसरीच्या भाजप आमदारांना शहराध्यक्षांचे वावडे

0
127

आमदार महेश लांडगे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावीः सचिन काळभोर यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

पिंपरी, दि. १२ (पीसीबी)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत तीन विधानसभा मतदारसंघ असून, त्या ठिकाणी चिंचवड व पिंपरी विधानसभा ह्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी शंकर जगताप शहर अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर यांचा फोटो फ्लेक्स बोर्डवर छापतात. त्यामुळे चिंचवड व पिंपरी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी सामान्य नागरिकांना भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप आहेत म्हणून नागरिकांना कल्पना आहे तसेच फ्लेक्स बोर्डमुळे माहिती झाली असून, दुसऱ्या ठिकाणी भोसरी विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांच्या जाहिरात बोर्ड तसेच फ्लेक्स बोर्ड ह्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष म्हणून प्रोटोकॉल नियमानुसार फोटो छापला जात नाही किंवा टाळले जातेय.

त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप आहेत किंवा नाही ह्याची भोसरी विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी सामान्य नागरिकांना कल्पाना नाही किंवा ओळख नाही. लोकसभा निवडणुकीत शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांचे फोटो जाहिरात बोर्डवर छापण्यात आले नव्हते. तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी आमदार महेश लांडगे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांचे फ्लेक्स बोर्डवर सांस्कृतिक कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम तसेच राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांचे फोटो फ्लेक्स बोर्ड वर छापत नाही किंवा टाळत असून त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी सामान्य नागरिक यांना भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांची ओळख होत नसल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांचे फोटो फ्लेक्स बोर्डवर लावणार आहे किंवा नाही याचा जाहीर खुलासा भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमदार महेश लांडगे ह्यांना वैयक्तिक पातळीवर लेखी पत्राद्वारे समज पत्र देऊन मागविण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.

काळभोर यांनी म्हटले आहे की, भविष्यात भोसरी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांचे फोटो फ्लेक्स बोर्ड वर छापण्यात येईल. ही अपेक्षा भोसरी विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे ताकत खुप मोठ्या प्रमाणावर असून, सन २०१४ रोजी अपक्ष उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात दोन नंबर मतदान झाले होते. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. सध्या आमदार महेश लांडगे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप तसेच इतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे सांस्कृतिक धार्मिक राजकीय कार्यक्रम या ठिकाणी जाहिरात बोर्डवर फोटो छापण्यात येत नसून, कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यासंदर्भात भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ताबडतोब दखल घेऊन आमदार महेश लांडगे ह्यांच्या विरोधात शिस्तभंग कारवाई करण्यात यावी. जेणेकरून भविष्यात भोसरी विधानसभा ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाची ताकद दिसली पाहिजे पक्षाची ताकद वाढली पाहिजे. पक्षापेक्षा आमदार मोठा नसून, पक्ष मोठा राष्ट्र मोठे नंतर आमदार ही भुमिका जाहीर व्हायला पाहिजे. कार्यकर्ते मनापासून भारतीय जनता पक्षाचे काम करत असून, त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी नाराजी पसरली आहे.