भूगोल फाउंडेशन तर्फे अंघोळीची गोळी संस्थेचा सन्मान

0
13

दि. 2 ( पीसीबी )  – अंघोळीची गोळी ही संस्था गेली दहा वर्षे पर्यावरण या क्षेत्रात सामाजिक काम करत आहे.
पाणी बचत आणि जलसंधारण या कामात आंघोळीची गोळी पुढाकार घेते.
तसेच खिळे मुक्त झाडं या अभियानांतर्गत संस्थेने आजवर हजारो झाडांचे एक लाख पेक्षा जास्त खिळे काढलेले आहेत.
नुकतेच संस्थेच्या वतीने क्लायमेट ॲक्शन या इंग्रजी शब्दाकरिता हवामानठोसा या मराठमोळ्या शब्दाचे अनावरण 98 या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
पिंपरी चिंचवड शहरात अंघोळीची गोळीने झाडे लावण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच दिवाळीमध्ये अंघोळीची गोळी संस्थेने ‘मी फटाके वाजवले नाही’ अशी अनोखी स्पर्धा शहरात घेतली होती.
या सर्व सामाजिक कामांमुळेच भूगोल फाउंडेशन तर्फे संस्थेला गौरवण्यात आले. अंघोळीच्या गोळीचे पिंपरी-चिंचवड शहराचे समन्वयक राहून धनवे यांनी हा सन्मान भूगोल फाउंडेशनचे विठ्ठल नाना वाळूज तसेच आपला म्युझिकल ग्रुपचे अनिल घाडगे यांच्या हस्ते स्वीकारला.