भूगावमध्ये 16 लाखांचा गुटखा पकडला

0
309

हिंजवडी, दि. २६ (पीसीबी) – भूगाव मध्ये हिंजवडी पोलिसांनी 15 लाख 95 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पकडला. ही कारवाई शनिवारी (दि. 25) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

रामलाल चौघाजी चौधरी (वय 45) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार राजाराम सराटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुटखा विक्रीसाठी टेम्पो मधून आलेल्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. गुटखा घेऊन जाणाऱ्या टेम्पोला पोलिसांनी अडवले असता रामलाल याने टेम्पो न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. टेम्पोमधून 15 लाख 95 हजार 288 रुपयांचा गुटखा जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.