भुमकर चौक वाकड येथे भरधाव मिक्सरने एका कारला धडक दिली. त्यामध्ये कार चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 8) दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास घडली.
अजिंक्य विजयकुमार खोत (वय 43) असे मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अजिंक्य यांच्या बहिणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिक्सर चालक खुर्शीद ऐताल शेख (वय 26, रा. विनोदेनगर हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान भाऊ अजिंक्य खोत हा कारमधून भुमकर चौकातून डांगे चौकाच्या दिशेने जात होता. भुमकर चौकात आरोपी शेख याने त्याच्या ताब्यातील मिक्सरने खोत यांच्या कारला धडक दिली. त्यामध्ये खोत हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी शेख याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.