भुजबळांचा पुरेपूर वापर झाला – संजय राऊत

0
12

मुंबई, दि. 17 (पीसीबी) : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये तिन्ही पक्षांमध्ये भाजप २०, शिवसेना १२ आणि राष्ट्रवादी १० अशी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. यामधील सर्वाधिक धक्कदायक म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नसल्याने सर्वांना धक्का बसला. नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पण भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. शिवसेनेचे नेते विजय शिवतारेही मंत्रिपदासाठी इच्छुक होते. परंतु त्यांनाही मंत्रिपद मिळालं नसल्याने तेसुद्धा नाराज झालेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे सरकार आहेत ईव्हीएम सरकार याला चटके बसतील अशी शक्यता नाही. मधल्या काळामध्ये मनोज जरांगेंविरूद्ध भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली, त्यांनी संयम पाळायला हवा होता. मराठा आणि ओबीसी समाज महाराष्ट्रातील प्रमुख सामाजिक घटक आहेत. त्यावेळी ती भूमिका त्यांना घ्यायला लावली. भुजबळांचा पुरेपूर वापर झाला असं स्पष्ट दिसत आहेत. आता त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. काही लोक अश्रू ढाळताहेत त्यांना कोण विचारणार, पुरंदरचे, मुंबईमधील मागठाण्याचे आणि चंद्रपूरचे सुधीर मुनगंटीवार यांच्या अश्रूंना काय किंमत आहे. रडतील-रडतील आणि गप्प बसतील. त्यांच्या हातात खुळखुळा दिली जाईल मग शांत केलं जाईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा रहावा या मताचे आम्ही आहोत. भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली, तेव्हा त्यांच्या मागे एक अदृश्य शक्य होती. तिने त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि त्यामुळेच त्यांचा बळी गेला असं आमचं आकलन आहे. पक्ष फोडण्यासाठी आमच्यामागे होती तीच भुजबळांना उत्तेजन देत असल्याचं राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे काही नग आहेत, त्यासंदर्भात फडणवीसांनी अभ्यास करायला हवा. या नगांविषयी काय भूमिका घेतली होती, किती प्रकारचे पेपर राज्यापालांकडे सोपवले गेले आहेत. या नगांना घेऊन आता फडणवीस आदर्श राज्य कारभार करणार आहेत हे ऐकूण आमचं मनोरंजन झालं. पुढील वर्षामध्ये असे अनेक प्रसंग पाहू आणि सहन करू. राज्यातील अनेक भागामध्ये तणाव आहे, त्याकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे असंही संजय राऊत यांनी सांगितलं.