भिशीच्या बहाण्याने कोट्यावधींची फसवणूक; पाच महिलांवर गुन्हा दाखल

0
83

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) दिघी,
भिशी सुरु करून नंतरचा नंबर घेतल्यास जास्त पैसे मिळतील असे लोकांना आमिष दाखवून लोकांची कोट्यावधींची फसवणूक केली. याप्रकरणी पाच महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वडमुखवाडी येथे घडली.

बालाजी मसू सोनवणे (वय 31, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी याप्रकरणी दिघी पोल्सी ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वडमुखवाडी परिसरातील पाच महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी भिशी सुरु करून फिर्यादीस नंतरचा नंबर घेतल्यास जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवले. महिलांवर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी भिशी सुरु केली. आठ हप्त्याचे एकूण दोन लाख 22 हजार रुपये फिर्यादी यांनी भरले. त्यानंतर महिलांनी भिशी भरणे बंद केले. त्यानंतर फिर्यादी यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.

याच महिलांनी लोकांना भिशीचे आमिष दाखवून त्यांना पैसे भरण्यास भाग पाडले. शेवटचे नंबर घेतल्यास जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवले. लोकांकडून सुमारे अडीच कोटी रुपये घेऊन ते पैसे लोकांना न देता त्यांची फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.