भिशीचे पैसे थकल्याने तरुणास मारहाण

0
3
crime

आळंदी, दि.22 (पीसीबी)
भिशीचे पैसे थकल्याने दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २०) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास केळगाव येथे घडली.

तुकाराम भानुदास पाटील (वय २५, रा. केळगाव) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश रामराव पांचाळ, श्रीधर होळप्पा धुरंगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील आणि आरोपी यांची भिशी आहे. पाटील यांनी भिशी देण्यास उशीर केला. त्या कारणावरून आरोपी शुक्रवारी रात्री पाटील यांच्या घराजवळ आले. त्यांनी पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर दगडाने मारून त्यांना जखमी केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.