भिवंडीत इमारत कोसळली; ४० ते ५० जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

0
174

भिवंडी, दि. २९ (पीसीबी) – भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे तीन मजली इमारत पत्यासारखी कोसळली. संपूर्ण इमारत भुईसपाट झाली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६० लोक दबल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळपाडा येथे आज दुपारी ही इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोसळलेली इमारत ही तीन मजली होती. यात एकूण १५ ते १६ कुटुंब राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच खालच्या मजल्यावर काही कामगार देखील राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका दाखल झाली आहे. युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. मात्र, यातील जीवितहानी बद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही