भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक होणार

0
283

पुणे, दि.२८(पीसीबी)- मुलींची पहिली शाळा भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होणार, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले आहे.

पुण्यातील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे अशी मागणी आज विरोधकांनी केली. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होणार, याबाबत आश्वासन दिले.

मागील अनेक वर्षांपासून या प्रश्नवरुन पुणे महानगरपालिका आणि भिडे वाड्यांतील भाडेकरु यांच्यात वाद सुरु आहे. 2008 मध्ये राज्य सरकारने महापालिकेची जागा वाटप नियमावली केली आहे. यात जागा आणि मोबादला यावर तो़डगा निघाला नाही. अखेर आज विधानसभेत विरोधकांना हा विषय पुन्हा एकदा उचलून धरला.

10 मार्चच्या आत भाडेकरूंचा प्रश्न मार्गी लावून त्यांचा रेडी रेकनर आणि बाजारभावाप्रमाणे जो काही मोबदला आहे तो देऊन मोकळे व्हा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग लवकरच खुला होणार आहे.