भिडेवाडा कविसंमेलनाला उदंड प्रतिसाद

0
86

पिंपरी (दिनांक : ३० सप्टेंबर २०२४)
भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा आंतर राष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत पुणे जिल्हास्तरीय पिंपरी – चिंचवड विभागाचे कविसंमेलन पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात रविवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाले.

या कविसंमेलनास रसिक आणि कवी यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या कवींनी देशातील मुलींची पहिली शाळा या विषयावर आपल्या अतिशय सुंदर, वैविध्यपूर्ण, प्रबोधनपर रचना सादर केल्या. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाडयात सुरू केलेल्या देशातील मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, घराघरात पोहोचावा या एकमेव उद्देशाने भिडेवाडा काव्य जागर अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात या जिल्हास्तरीय कविसंमेलनांचे आयोजन आणि नियोजन करण्यात येणार आहे, असे या अभियानाचे जनक आयोजक कवी विजय वडवेराव यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कांचन मून, अशोक सोनवणे, मेहमूदा शेख, प्रतिमा काळे, प्रतिभा कीर्तीकर्वे, आत्माराम हारे, संजय खोत, कांचन नेवे इत्यादी कवींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रतिमा काळे आणि प्रतिभा कीर्तीकर्वे यांनी केले; तर आभार प्रदर्शन मेहमूदा शेख यांनी केले.