भिकू वाघेरे पाटील यांना अभिवादन

0
120

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

पिंपरी वाघेरे येथील भिकू वाघेरे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादन कार्यक्रमास ग क्षेत्रीय अधिकारी गणेश येळे, कार्यकारी अभियंता नितिन निंबाळकर,जहिरा मोमीन,महेश तावरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच नागरिक उपस्थित होते.