पिंपरी चिंचवड – संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन मुक्कामी आकुर्डी येथे झाले. या पार्श्वभुमीवर समता सैनिक दल व हक्कदार सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने वारकरी बांधवांसाठी खास मसाज सेवा दिल्यामुळे वृध्द वारकरी बांधवांच्या आनंदाला पारवार उरला नाही.
डोळ्यात प्राण आणू विठुरायाची ओढ लागलेले वारकरी बांधव पावसाची रिमझिम चालून चालून थकलेले पाय जेंव्हा मुक्कामी येवुन विसावतात तेंव्हा त्याना चांगला आराम मिळावा म्हणून झेंडू बाम व आयुर्वेदिक तेल लावून भाविकांच्या पायाची व शरीराची मालिश केल्यामुळे वारकर्यांनी भरभरून आशिर्वाद दिले.
देहूगाव ते आकुर्डी १०-१२ किलोमीटर पायी प्रवास करून आलेल्या वारकरी बांधवांसाठी खास मालीश करणार्या मशीनने पायाची मालीश करून चालून चालून आलेला थकवा दूर करीत आहे.
समता सैनिक दलाचे संघटक मनोज भास्कर गरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली “मोफत मसाज सेवा” हा उपक्रम राबिवन्यात आला. आकाश इजगज, समिर शेख, उमा शेख, श्वेता निकाळजे, प्रेम वाघमारे, हनुमंत कांबळे, अभिजीत शेलार, प्रशांत मस्के, अथर्व निकाळजे, शिवप्रकाश ढूनमून,गणेश शेळके,पुजा गायकवाड, दिनेश वाघमारे,गोकूळ कांबळे, रवि शिंदे, सिद्धार्थ व इतर दहा स्वयंसेवकांनी मसाज सेवा मनोभावे दिली. फिजियोथेरिपिस्ट डॅा.अनिकेत सावळे,डॅा.कौस्तूक दादेराव व त्यांच्या टिमने देखील मोलाचे योगदान दिले.
स्थानिक नागरीक व पोलिस प्रशासन यांनी योग्य ती गरजेची सेवा दिल्या बद्दल या उपक्रमाचे अभिनंदन केले.