भारत स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र म्हणवू शकत नाही, बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची सुटका केल्याने आयएएस अधिकारी स्मिता सभरवाल यांची टीका

0
342

देश,दि.२३(पीसीबी) – स्वातंत्र्यदिनी बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची सुटका केल्याबद्दल गुजरात सरकारवर टीका होत आहे. सर्व विरोधी पक्षांनी आतापर्यंत या दोषींच्या सुटकेला चुकीचे म्हटले आहे आणि त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे. दरम्यान, वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिव स्मिता सभरवाल यांनी गुजरात सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. स्मिता सभरवाल यांनी बिल्किस बानोला न्याय देण्याची मागणी केली आहे.

नक्की काय म्हणाल्या स्मिता सभरवाल?
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सचिव स्मिता सभरवाल यांनी सोशल मीडियाद्वारे म्हटले आहे की, एक महिला आणि नागरी कार्यकर्ता म्हणून मी हे अजिबात स्वीकारू शकत नाही. बिल्किस बानोचा श्वास घेण्याचा अधिकार काढून घेतल्यानंतर भारत स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र म्हणवू शकत नाही. स्मिता सभरवाल यांनी तिच्या सोशल मीडिया पोस्टसह #JusticeForBilkisBano असं देखील पोस्ट केलं आहे.

गुजरात सरकारने 15 ऑगस्ट रोजी बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका केली होती. हे सर्व दोषी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. या सर्वांवर बिल्किस बानोवर बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाला होता. २०२२ च्या गुजरात दंगलीत त्यांच्यासोबत ही घटना घडली आणि गोध्रा घटनेनंतर गुजरात दंगल झाली. तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनी 11 दोषींच्या सुटकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 11 दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा निर्णय मागे घेण्यास सांगितले होते.