भारत भ्रमण सायकल करणाऱ्या प्रदीप कुमार यांच्या उपस्थितीत आय ए एस तर्फे वृक्षारोपण…

0
446

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – इंडो अथलेटिक सोसायटी तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, याला कारण होते प्रदीप कुमार यांचे पिंपरी चिंचवड येथे येणे, प्रदीप कुमार हे सध्या सायकलवर भारत भ्रमण करत असून कालच ते पिंपरी चिंचवड येथे आले.

नेहमीप्रमाणे इंडो ॲथलेटिक सोसायटी सोसायटी तर्फे प्रदीप कुमार यांच्या राहण्याची व भोजनाची सोय निगडी येथे करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डनमध्ये त्यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी लायन्स क्लबचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते हिरामण भुजबळ, इंडो असल्यास सोसायटीचे गणेश भुजबळ,अजित पाटील, गजानन खैरे ,कैलास शेठ तापकीर उपस्थित होते.