दि.२६(पीसीबी)- भारतावर अमेरिकेचा दबाव वाढत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना स्वदेशी वस्तू वापरण्याचा सल्ला दिला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातही त्याचा परिणाम दिसून येत आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर आज औषधी क्षेत्रालाही ट्रम्प यांनी धक्का दिला. H1-B व्हीसाचे शुल्क 88 लाख रुपयांच्या घरा गेले आहे. आता देशी डिजिटल प्लॅटफॉर्मची क्रेझ वाढत आहे. देशात अमेरिकन ॲप्सवर बहिष्काराचे अस्त्र वापरण्यात येण्याची शक्यता आहे. अशावेळी ते कोणते स्वदेशी टेक आहे जे या अमेरिकन ॲप्सला धोबीपछाड देऊ शकतात. पर्याय ठरू शकतात?
Zoho Corporation ने Arattai हे WhatsApp प्रमाणे सुरक्षीत भारतीय ॲप तयार केले आहे. हे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, ग्रुप चॅट आणि मल्टिमीडिया शेअरिंगची सुविधा देते. हे ॲप ‘आत्मनिर्भर भारताचे’ प्रतिनिधीत्व करते. तर हे ॲप WhatsApp इतके लोकप्रिय होईल का, हा प्रश्न आहे.MapmyIndia चे Mappls, Google Maps साठी भारतीय पर्याय आहे. या ॲपमध्ये सविस्तर नकाशा, सध्या ट्रॅफिकची स्थिती काय आहे आणि ठिकाणाची माहिती देते. शहरासह ग्रामीण भागातील रस्ते दाखवते. Mappls भारतीय भूगोल जाणून आहे. ते नॅव्हीगेशन आणि स्थानिक माहिती देते.Zoho Writer हे दमदार वर्ड प्रोसेसिंग टूल आहे. Microsoft Word साठी हा पर्याय आहे. क्लाउड-आधारित हा प्लॅटफॉर्म एडिटिंग, फॉर्मेटिंग आणि इतर सोयी सुविधा पुरवतो.










































