भारत केसरी विजय गावडे विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल

0
178

भारत केसरी असलेल्या विजय गावडे याच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० मे २०१४ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भोईर आळी, चिंचवडगाव येथे घडली.

याप्रकरणी विजय याच्या पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय हनुमंत गावडे (३८), कमल हनुमंत गावडे (६०), हनुमंत बाळासाहेब गावडे (६५, तिघे रा. भोईर आळी, चिंचवडगाव), वैशाली प्रदीप बेलदारे (४३, कात्रज), किरण सौरभ कोकाटे (२८, पाषाण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला पती विजय, सासू कमल, सासरे हनुमंत, नणंद वैशाली आणि चुलत नणंद किरण यांनी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. महिलेला मारहाण करून शिवीगाळ केली. त्यांना सतत टोमणे मारून शिवीगाळ करून त्रास दिला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.