- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रप्म यांचा मोठा दावा
दि . १० ( पीसीबी ) – गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान याा आशियातील दोन देशांमध्ये युद्ध सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रप्म यांनी मोठा दावा केला आहे. “भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे.
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दोन्ही देशांमधील दीर्घ चर्चेनंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.
“अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मी आनंदाने जाहीर करतो की भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा सामंजस्यपणा आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन! या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची प्रतिक्रिया
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार म्हणाले, पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ शस्त्रसंधीवर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच त्यांच्या सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता, या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्याला पाकिस्तानकडून प्रतिसाद मिळाला आहे. पाकिस्तानकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. भारत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, आज काही वेळापूर्वीच भारताकडून दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचं समजलं जाईल असा इशारा भारतानं दिला आहे. दहशतवादी हल्ला झाल्यास थेट युद्ध समजून उत्तर दिलं जाईल. ही भारताकडून करण्यात आलेली सर्वात मोठी घोषणा आहे.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पहलगाममध्ये भारताच्या 26 पर्यटकांचा मृत्यू
दहशतवाद्यांनी पहलगाम इथे पर्यटकांवर हल्ला केला होता. 22 एप्रिलला झालेल्या या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने कडक धोरण स्वीकारलं होतं. भारताने 7 तारखेच्या रात्री एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मिरातील 9 ठिकाणांवर हल्ले करुन, दहशतवादांना कंठस्नान घातलं होतं.