दि. ५ (पीसीबी) -अमेरिकेने भारताला आपला मित्र म्हणत म्हणत तब्बल 50 टक्के टॅरिफ लादला आहे. रशियाचे तेल हे फक्त अमेरिकेचे कारण आहे. जर भारत आणि चीनने डॉलरच्या तुलनेत नवीन पेमेंट सिस्टम सुरू केली तर तो फक्त अमेरिकाच नाही तर जगालाही मोठा धक्का असणार आहे. हेच नाही तर भारत आणि चीनचा हाच प्लॅन असून त्याला रशियाचा देखील पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली असून हा डॉलरसाठी धक्का असून डॉलरच्या किंमत पडण्याचीही शक्यता आहे.
चार दिवसांपूर्वीच अमेरिकेकडून भारताला मोठी ऑफर देण्यात आली. रशियाकडून भारताने तेल खरेदी करणे बंद करावे, त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ काढण्यास अमेरिका तयार आहे. रशियाकडून तेल खरेदी भारत करत असल्यानेच भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला. मात्र, अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर काही वर्ष संवाद बंद असलेला चीन भारताच्या जवळ आला. हेच नाही तर अमेरिकेच्या विरोधात भारतासोबत चीनही मैदानात उतरला आहे. चीनकडून या काळात काही महत्वाचे करार हे भारतासोबत करण्यात आली आहेत. आता भारत आणि चीन हे दोन देश मिळून अमेरिकेला धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
मागील घडलेल्या गोष्टी आणि वाद विसरून अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर देण्यासाठी भारत आणि चीन एकत्र आली आहेत. एससीओ शिखर परिषदेदरम्यान यावर चर्चा झाली. हेच नाही तर रशिया देखील दोन्ही देशांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देत भारत, चीन आणि रशिया डॉलरऐवजी व्यापारासाठी एक नवीन प्रणाली आणण्याच्या तयारीत आहेत. भारतावर टॅरिफ लावून स्वत:च्याच पायावर मोठा दगड डोनाल्ड ट्रम्प यांनी पाडून घेतला आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक मॅटेओ मॅझिओरी यांनी याबद्दल भाष्य केले आहे. शक्तिशाली देश आता राजकीय प्रभाव पाडण्यासाठी व्यापार आणि वित्तीय प्रणालींचा शस्त्र म्हणून वापर करत आहेत. भारत आणि चीनसारखे देश आता पर्यायी पेमेंट सिस्टम तयार करत आहेत. आता दोन्ही देश मिळून अमेरिकेवर दबाव टाकण्याचे काम करत आहेत. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे दुर्मिळ खनिजांवर चीन नियंत्रण ठेवत आहे.