भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन

0
4

पुणे, दि. १७ (पीसीबी)
सकाळ पेपरचे अध्यक्ष प्रताप पवार यांच्या सौभाग्यवती आणि
शरद पवार यांच्या धाकट्या भावजय भारत पवार यांच्या आज निधन झाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याबाबत ट्विट केले आहे.
ट्विट मध्ये सुळे यांनी म्हटले आहे की,
अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खुप प्रेम केले. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील.काकी, भावपूर्ण श्रद्धांजली.
सकाळ पेपरचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या त्या मातोश्री होत.