दि . १२ ( पीसीबी ) – भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केल्याचं म्हटलं आहे. हे ऑपरेशन करणाऱ्या भारतीय सैन्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या केरळच्या एका मुक्त पत्रकाराला नागपुरात अटक करण्यात आली आहे.
देशविरोधी कारवाई केल्याचा आरोप त्यांच्यावर असून त्यांना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर इतरही आरोप आहेत.
नागपुरातील लकडगंज पोलिसांनी एका हॉटेलमधून त्यांना अटक केली. त्यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट करण्याशिवाय त्यांच्यावर इतरही काही आरोप होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेजाज एम. शिबा सिदीक असं या 26 वर्षीय मुक्त पत्रकाराचं नाव आहे.
ते केरळमधल्या एडापल्लीचे रहिवासी आहेत. तसंच डेमोक्रेटीक स्टुडंट असोसिएशनचे सदस्यही आहेत. “मकतूब मीडिया” या केरळमधील न्यूज वेबसाईटसाठी ते लिहितात.
तो काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका परिषदेत सहभागी होण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर केरळला जायला निघाले. पण, त्याआधी मैत्रिणीला भेटायला नागपुरात आले होते.