भारतीय रायफल शूटिंग संघात निवड झालेल्या तेजस वाघेरे पाटील यांचा सन्मान

0
2

पिंपरीगावातील २२ वर्षीय नेमबाज तेजस वाघेरे-पाटील याची भारतीय शूटिंग (नेमबाजी) संघात निवड झाली असून तो आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल आणि २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल या दोन प्रकारात खेळणार आहे.

तेजस हा पिंपळे सौदागर येथील एक्सलन्स शूटिंग स्पोर्ट्स क्लबमध्ये सौरभ साळवने यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांपासून सराव करतो आहे. अतिरिक्त प्रशिक्षणासाठी तो म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर सराव करतो. त्याच्या सततच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला देशातील प्रथम ५० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले असून त्याची ६७ व्या भारतीय शूटिंग अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणीसाठी निवड झाली आहे. दिल्लीच्या साई सेंटरमध्ये प्रशिक्षणानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये
भारतीय संघातर्फे खेळण्याची संधी त्याला मिळणार आहे, त्याला प्रोत्साहन देण्याकरिता अभिमन्यू मित्र मंडळ पिंपरी गाव यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.