भारतीय जनता युवा मोर्चाचा ‘विकसित महाराष्ट्रासाठी माझी आयडिया’ अभियान

0
88

चिंचवड, दि. 25 (पीसीबी) : चिंचवड येथे भारतीय जनता युवा मोर्चाची पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी मंडल अध्यक्ष व जिल्हाध्यक्षांकडून जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. तसेच ‘विकसित महाराष्ट्रासाठी माझी आयडिया’ अभियान जास्तीत जास्त युवांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामान्य युवांपर्यंत जाऊन कशाप्रकारे संवाद झाला पाहिजे, याविषयी चर्चा झाली.

यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतरचा कार्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष श्री.अनूप दादा मोरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय महामंत्री श्री.वैभव सिंग यांना सादर केला. तसेच शहर जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी याप्रसंगी राष्ट्रीय मीडिया प्रभारी श्री. अमनदीप, प्रदेश महामंत्री श्री. सुदर्शन पाटसकर, प्रदेश उपाध्यक्ष श्री. अमृत मारणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. निवेदिता एकबोटे, प्रिया पवार, ऐश्वर्या जगताप, प्रदेश उपाध्यक्ष श्री. नवनाथ पठारे, विद्यार्थी आघाडीचे श्री. रमाकांत कापसे, प्रदेश सचिव श्री. रौनक शेट्टी, श्री. अजित कुलथे, युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.