भारतीय जनता पार्टीचा ४४ वर्धापन दिन साजरा

0
190

पिंपरी,दि. ६ (पीसीबी) : भारतीय जनता पार्टीचा ४४ वा वर्धापन दिन आज शनिवारी (दि.६) रोजी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यालय मोरवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी, आमदार अश्विनीताई जगताप, आमदार उमाताई खापरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, सरचिटणीस विलास मडेगिरी, नामदेव ढाके, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस शीतल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर, माजी नगरसेवक माऊली थोरात, केशव घोळवे, युवा मोर्चा प्रदेश तेजस्विनी कदम, ज्येष्ठ कार्यकर्ता संयोजक नंदू कदम, नंदू भोगले, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाड्ये, बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका प्रीती कामतीकर, उपाध्यक्ष आशा काळे, चिटणीस राजश्री जायभाय, चिटणीस गिता महेंद्रु, महेश बारसावडे, विशाल वाळुंजकर, गणेश लंगोटे, विजय शिनकर, रवी देशपांडे, भूषण जोशी, जयदीप खापरे, कैलास सानप, डॉ. तृप्ती परदेशी, शोभा भराडे, राधिका बोर्लीकर, सतीश नागरगोजे, संदेश गादिया, देवदत्त लांडे, संतोष टोनगे, मुकेश चुडासमा, सुरेश गादिया, सीमा चव्हाण, अश्विनी कांबळे, संजय परळीकर यांच्यासह जिल्हा पदाधिकारी,मोर्चा/ आघाडी / प्रकोष्ठ प्रमुख, मंडल पदाधिकारी,विधानसभा वॉरियर्स, शक्ति केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना पक्षाच्या आतापर्यंत ४४ वर्षाचा लेखा जोखा मांडला. आज भारतीय जनता पक्ष हा एकनिष्ठ कार्य केलेल्या कार्यकर्त्यामुळे संपुर्ण जगात एक नंबर आहे. आजचे हे वैभव आपल्याल्या जे पाहायला मिळत आहे. ते फक्त कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे, म्हणून भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार तिसर्यांदा सत्येत आणायचे असून त्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शहरात पक्षवाढीसाठी कार्य केलेल्या जेष्ठ कार्यकर्ते यांचे आभार मानण्यात आले. तसेच पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा निहाय ८ मंडलामध्ये प्रत्येक बुथ वर ध्वजारोहण करण्यात आले.