भारताविरुद्ध तरुणांची फौज उभी करणाऱ्या दहशतवाद्याचा पाकिस्तानात खात्मा…!

0
345

विदेश,दि.११(पीसीबी) – भारताच्या आणखी एका शत्रूचा पाकिस्तानात खात्मा झाला आहे. लष्कर-ए- तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान उर्फ ​​अक्रम गाझी याची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अक्रम भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकायचा. अक्रम खान याने 2018 ते 2020 या काळात लष्करातील भरतीचे काम पाहिले होते. अशातच अक्रमची पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात भारताविरोधात कारवाया करणाऱ्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तीन महिन्यांत तीन शत्रू मारले गेले आहेत. 9 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती.

लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) माजी नेता अक्रम खान यांची गुरुवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पाकिस्तानातील बाजौरमध्ये अक्रम खान उर्फ ​​अक्रम गाझी याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. दहशतवादी अक्रम गाझी याने 2018 ते 2020 या काळात लष्कर भरती कक्षाचे नेतृत्व केले. तसेच ते पाकिस्तानमध्ये भारतविरोधी भाषणांसाठी ओळखला जात होते. अक्रम हा लष्कराच्या प्रमुख कमांडरांपैकी एक आहे. तो बराच काळ दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता.

पाकिस्तानात अतिरेक्याची हत्या होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी मुफ्ती कैसर फारुख, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीर यांसारख्या अनेक दहशतवाद्यांनाही अज्ञात हल्लेखोरांनी ठार करण्यात आलं आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, भारताचा आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफचीही पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली होती. सियालकोटमध्ये लतीफला काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. 2016 मध्ये पठाण कोट एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा लतीफ मास्टरमाइंड होता. एअरफोर्स स्टेशनवर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांना तो पाकिस्तानमधून सूचना देत होता.

तर 6 मे रोजी खलिस्तानी कमांडो फोर्सचे प्रमुख परमजीत सिंग पंजवाड याचीही पाकिस्तानात हत्या करण्यात आली होती. लाहोरमधील पंजवाड येथे काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. तो बराच काळ लाहोरमध्ये राहून काम करत होता. पंजवाड हा पाकिस्तानातील तरुणांसाठी शस्त्र प्रशिक्षणाचेही काम पाहत होता. यापूर्वी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) येथील रावळकोट भागात दहशतवादी मोहम्मद रियाद मारला गेला होता. अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या अंगावर चार गोळ्या झाडल्या होत्या.