भारतावर टॅरिफ लादण्यासाठी ट्रम्प यांचे दबावतंत्र

0
4


मुंबई,दि.१३(पीसीबी)- जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेत एक नवीन उलथापालथ होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता रशियावर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी असे पाऊल उचलले आहे, ज्याचा थेट परिणाम भारत आणि चीनसारख्या मोठ्या बाजारांवर होऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताविरुद्धचे टॅरिफ वॉर संपवण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत. आता ट्रम्प प्रशासन G7 देशांच्या गटावर भारतावर मोठे टॅरिफ लादण्यासाठी दबाव आणत आहे.

फायनान्शिअल टाइम्सच्या अहवालानुसार ट्रम्प यांनी G7 देशांनी भारत आणि चीनकडून रशियन तेल खरेदीवर 50 ते 100 टक्के भक्कम शुल्क लादण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी प्रवक्त्याने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की चीन आणि भारताने खरेदी केलेले रशियन तेल पुतिनचे युद्धयंत्र चालवत आहे आणि युक्रेनियन लोकांच्या हत्येला लांबणीवर टाकत आहे. दोन्ही युरोपिअन देशनमधील युद्ध शांत होताच हे शुल्क मागे घेतले जातील.
अमेरिका भारतावरील टॅरिफ दबाव तंत्राला आपल्या शांतता आणि समृद्धी प्रशासनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणत आहे. रशियाला अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवल्याशिवाय वाटाघाटीच्या टेबलावर आणणे कठीण असल्याचे अमेरिकेचे मत आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून ट्रम्प सतत मित्र राष्ट्रांवर दबाव आणत आहेत.