भारताच्या स्मिता वाल्हेकर ला आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये दुहेरी सुवर्ण पदक

0
297

दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – दिल्ली इंदिरा गांधी स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान तिसरी वाको आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत जगभरातील 20 देशातील 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

भारताच्या स्मिता वाल्हेकर हिने आपल्या 70 किलो खालील वजनी गटात पॉइंट फाईट व लाईट कॉन्टॅक्ट या वेगवेगळ्या दोन इव्हेंट मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले व भारताला दुहेरी सुवर्ण पदक जिंकून देऊन भारताचे नाव उज्वल केले आहे.
तसेच मेघा गावडे हिने 55 किलो खालील वजनी गटात पॉइंट फाईट या इव्हेंट मध्ये सुवर्ण पदक, पूजा वाल्हेकर हिने 60 किलो वजनी गटात फुल कॉन्टॅक्ट या इव्हेंट मध्ये सुवर्ण पदक संपादन केले. तसेच आर्या अंबारे हिला रौप्य पदक, वैष्णवी टिजगे हिला कांस्य पदक, साईराज धुमाळ याला सुवर्ण पदक , रुहान गुलाटी याला कांस्य पदक, यश वाल्हेकर कांस्य पदक मिळाले आहे. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना घेऊन गेलेल्या स्मिता वाल्हेकर स्पोर्ट्स अकॅडमी च्या प्रशिक्षिका सुप्रिया वाल्हेकर यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले व सदर स्पर्धेसाठी सलग सहा महिने अथक परिश्रम करणाऱ्या स्पर्धकांचे देशाला पदक मिळवून दिले म्हणून आभार मानले सदर स्पर्धकांसोबत मुख्य प्रशिक्षक इक्बाल शेख यांनी देखील खूप परिश्रम घेतले.

सदर स्पर्धेचे आयोजन दिल्ली किक बॉक्सिंग असोसिएशनने यशस्वी रित्या पार पाडले. सदर स्पर्धेला वर्ल्ड किक बॉक्सिंग असोसिएशन चे प्रेसिडेंट रॉय बेकर ,टेक्निकल कमिटीचे चेअरमेन रोमिओ डेसा, ततामी स्पोर्टस् चेअरमन ब्रायन बेक , रिंग स्पोर्टस् चे चेअरमेन युरी , व्हाइस प्रेसिडेंट सलीम कायकी, भारताचे प्रेसिडेंट संतोषकुमार , महाराष्ट्र प्रेसिडेंट निलेश शेलार असे अनेक आंतरराष्ट्रीय कमिटी मेंबर उपस्थित होते.