नवी दिल्ली, दि.03 (पीसीबी)
भारतात सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठे बदल होऊ घातले आहे. पेट्रोल-डिझेल वाहनांना पर्याय शोधण्यात येत आहे. पर्यावरणपूरक पर्यायांवर संशोधन सुरू आहे. हायड्रोजन, इथेनॉल, ईव्ही वाहनांचा पर्याय समोर येऊ लागला आहे. आशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या हळूहळू वाढत आहेत. पण तरीही काही अडचणी आहेत. त्यावर मात करण्यासाठी भारताची पहिली Solar Car बाजारात येणार आहे. अवघ्या 45 मिनिटांत ही कार फूल चार्ज होईल. भारतासारख्या सूर्य देवतेचा आशिर्वाद असलेल्या देशात ही कार गेमचेंजर ठरणाार आहे. या कल्पनेला चालना मिळाली तर EV वाहनांचा लवकरच गेम ओव्हर होण्याची शक्यता आहे.
शहरी भागातील वाहतूक अडथळ्यांची शर्यत, कमी जागा, अरूंद रस्ते, वाहनतळाची समस्या, पेट्रोल-डिझेलची वाढलेली किंमत, ईव्ही वाहनांच्या चार्जिंगची अडचण या सर्व अडचणी, या सर्व अडचणींचा विचार ही कार तयार करताना करण्यात आला आहे. कारचे हे कॉम्पॅक्ट व्हर्जन अनेकांचा प्रवासाचा खर्च वाचवणार आहे. या कारविषयी सध्या माध्यमात जितकी चर्चा सुरू आहे. त्यापेक्षा सोशल मीडियावर तिची लोकप्रियता अधिक आहे.
एक चार्जिंगमध्ये 250 किमीचा टप्पा –
ही कार एका चार्जिंगमध्ये 250 किमीचा टप्पा पूर्ण करेल. तर एका वर्षात ती 3000 किमी धावेल. सौर ऊर्जेवर ही कार चार्ज होईल. या कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सुपरफास्ट चार्जिंग हे या कारचे वैशिष्ट्ये आहे.
अवघ्या 45 मिनिटांत ही कार फूल चार्ज होईल. भारतासारख्या सूर्य देवतेचा आशिर्वाद असलेल्या देशात ही कार गेमचेंजर ठरणाार आहे. पाच मिनिटांत ही कार 50 किमीने धावेल. या कारचा टॉप स्पीड 70 किमी प्रति तास असल्याचा दावा करण्यात येत आहे. या कारसाठी प्रति किलोमीटर 0.5 पैसे खर्च अपेक्षित असल्याचा दावा करण्यात येतो. आधुनिक ग्राहकांच्या अपेक्षेवर ही कार खरी उतरेल असा विश्वास वयवे ईव्हाचे सीईओ आणि सहसंस्थापक निलेश बजाज यांनी व्यक्त केला आहे.