वाल्हेकरवाडी, जिचे अस्तित्व मोरया गोसावी यांनी निर्माण केले. वाल्हे या पुरंदर तालुक्यातील गावावरून चिंचवड ला आश्रयास आलेल्या दोन पवार बंधूंना त्यांनी चिंचवडच्या या पश्चिम कोपऱ्यात एक मळा पावणामाईच्या कडेला दिला व वाल्हे वरून आले म्हणून वाल्हेकर हे नावही दिले. या दोन्ही मुळ पुरुष बाळूजी बुवा व बापूजी बुवा यांचा गेली पावणे पाचशे वर्षांचा हा विस्तार आज शंभराहुन अधिक उंबरयांचा आहे. त्या काळी चरितार्थासाठी मुख्य व्यवसाय शेती हा असल्याने पुढे वाण्या – बामणांच्या जमिनी विकत घेवून यांनी पवना माई च्या पाण्यावर उत्कृष्ट शेती केली. दुध व दुधाचे उप पदार्थ तसेच शेणागौर्यांची विक्री करून यांचा चरितार्थ चालत असे.
पुढे विकसनात रेल्वे प्राधिकरण रस्ते या मधे जमिनी आरक्षित व हस्तांतरित झाल्याने नदी काठच्या काळ्याभोर छोट्या जमिनींचेच तुकडे शिल्लक राहिले. आज ही डीपी रोड – टीपी स्कीम तसेच नवीन येऊ घातलेला रहिवास झोन या मुळे उरल्या सुरल्या शेतजमिनी ही शेवटच्या घटकामोजत आहेत.
अश्या परिस्थित यांत्रिकिकरण व भौतिक सुखाच्या लालसा या पासुन दुर राहून अवघी बोटावर मोजणारी काही कुटुंबे जनावरे व गाई, म्हशी, बैल सांभाळतात.
त्यातीलच एक अग्रगण्य परिवार हा गीर गाई – खिलार गाई आणि मोठ्या मापाची कर्नाटकी खिलार सांभाळणारे गोपालक स्वर्गीय पोपटराव दशरथ वाल्हेकर यांची मुले
प्रदीप पोपटराव वाल्हेकर व संदीप पोपटराव वाल्हेकर. तसेच त्यांचे बंधू आनंदा दशरथ वाल्हेकर आणि अजित व तुषार ही त्यांची मुले व एकूणच पन्नास जणांचा त्यांचा परिवार आजच्या युगातील उत्तम गौसेवा व देशवंश टिकावा व पुढे जावा या उद्दिशाने तसेच ईश्वर सेवा या बैलांच्या माध्यमातून करता यावी देहू आळंदीच्या आषाढी वारीला रथाला तसेच चैत्रातील गावयात्रा बगडाला गणपती उत्सववात देवी उत्सववातील रथाला या बैलजोडीला आजवर विशेष मान प्राप्ती झाला आहे.
सध्या त्यांच्याकडे हरण्या, हिर्या व सोन्या राजा ही चार बैल आहेत भाद्रपद पोळ्याला या सर्व नंदीच्या ऋणातून मुक्त व्हावे या उद्देशाने खरतर हा बैलपोळा साजरा केला जातो. त्या दिवशी बैलांना कोणते ही काम दिले जात नाही तसेच आदल्या दिवशी त्यांची खांदे मळणी केली जाते. खांदे मळणी म्हणजे वर्षभर ज्या खांद्यावर ओझे घेऊन कष्ठ करतात, शेती फुलवतात त्या खांद्याला आराम मिळावा, त्या जखडलेल्या शिराणा आराम मिळावा या साठी बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी लोणी कावू व हळद मिक्स करून त्याने खांद्याला लावुन मशाज केली जाते.
बैलपोळायच्या दिवशी धुवून धावून तसेच शिंगाना रंग रंगोटी करून, सजवायला मोरपिसाच्या शेंड्या, गळ्यात पितळी तोडे, माथ्यावर बांधण्यात शिंग दोरी, कंबरपट्टा पायात गोंडे पैंजण व गळ्यात चवर व शिंगोळी बांधून यांना सजवल जात.
गोठ्यावरून वाजत गाजत ग्रामदैवत दर्शन व ग्रामप्रदक्षिणा साठी यांना घेऊन जातात. मारुती मंदिर दत्त मंदिर व विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन व प्रदक्षिणा झाल्या नंतर बैलांना घरी आणले गेले. त्याना घरातील सुहासिनींनी औक्षण करून गूळ पोळीचा नैवेद्य चारला. परिवारातील सर्वच सदस्य या वेळी तेथे उपस्थित होत.
या नंतर गोठ्यात बैलांना बांधल्यावर त्यांच्या समोर वाल्हेश्वर भजनी महिला मंडळ व माऊली भजनी मंडळ थेरगाव यांची भजन सेवा या ठिकाणी झाली
व सर्व सोहळ्यातील विशेष भाग म्हणजे यातील सर्व गोष्टी पुढाकाराने पाहणारे ज्यांच्याकडे रोजची सर्व बैलांची जबाबदारी असते ते कुटुंबातील सदस्य संदीप पोपटराव वाल्हेकर यांनी तयार केलेली व आमलात आणलेली एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांच एक ब्रिदवाक्य आहे “आम्ही फक्त माणस जोडतो आपला पॅटर्नचं वेगळा आहे “
आणि हे भाद्रपद बैलपोळा उस्तवात वाल्हेकर कुटुंबियांकडुन ही व संदिप यांच्या रोजच्या व्यावसायिक व सामाजिक जीवनात देखील याची पदोपदी प्रचिती येते ,
या सोहळाच्या शेवटाला सर्व परिवाराने एकत्रित भोजन करून या बैलपोळा सोहळ्याची सांगता केली.














































