भाड्याने नेलेल्या जेसीबीचा अपहार

0
310

दरमहा 70 हजार रुपये भाडे देतो, असे सांगून जेसीबी नेला. त्यानंतर जेसीबीला लावलेला जीपीएस बंद करून थकलेले सव्वाचार लाख रुपये भाडे न देता जेसीबीचा अपहार केला. हा प्रकार 13 जानेवारी ते जुलै या कालावधीत जाधववाडी चिखली येथे घडला.

योगेंद्र शिवाजी उदागे (वय 32, रा. सुसरे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी माऊली उर्फ ज्ञानेश्वर किसन जाधव (वय ५१, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांचा जेसीबी दरमहा 70 हजार रुपये भाडे देतो, असे सांगून नेला. त्यानंतर फिर्यादी यांनी जेसीबीला लावलेली जीपीएस यंत्रणा बंद केली. 13 जानेवारी ते 17 जुलै या कालावधीतील 70 हजार रुपये दरमहा प्रमाणे चार लाख 20 हजार रुपये भाडे न देता स्वतःचा फोन बंद करून आरोपी पळून गेला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.