भाड्याने नेलेल्या कारची बनावट कागदपत्रे बनवून विक्री

0
150

एक महिन्यासाठी भाड्याने नेलेल्या कारची बनावट कागदपत्रे बनवून ती मूळ मालकाच्या परस्पर विकली. ही घटना 13 मार्च ते 23 मे या कालावधीत हिंजवडी फेज एक येथे घडली.

प्रसाद प्रल्हाद बारटक्के (वय 29, रा. हिंजवडी. मूळ रा. सांगली) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम शाम मोहतुरे (रा. गणेश पेठ, नागपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम याने फिर्यादी बारटक्के यांच्याकादुंत यांची पाच लाखांची ह्युंदाई ओरा कार (एमएच 14/जेएम 2381) एक महिन्यासाठी भाडे तत्वावर नेली. त्यांची कार त्यांना आजवर परत केली नाही. बारटक्के यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या कारचे आरसी बुक, पॅन कार्ड, आधार कार्ड, टीटी फॉर्म इत्यादी बनावट कागदपत्र बनवून त्यावर बारटक्के यांच्या खोट्या सह्या करून कारची परस्पर विक्री केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.