रावेत, दि. २४ (पीसीबी) – भाड्याने दिलेल्या दुचाकी परत न देता अडीच लाखांची फसवणूक केली आहे. हि घटना १८ डिसेंबर २०२३ रोजी किवळे येथे घडली आहे. रावेत पोलीस ठाण्यात अशोक बोरीटकर (वय ३० रा.सुखवानी) यांनी गुरुवारी (दि.२२) फिर्याद दिली आहे. यावरून अमीर काझीमिया काझी ( रा. तुकाई नगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मित्राकडून १ लाख २५ हजार रुपयांची रॉयल एनफील्ड, तसेच आर.वन यमाहा १ लाख २५ हजार रुपयांच्या दोन दुचाकी भाड्याने घेतली. तसेच परत करण्यासाठी फोन केला की उडवा- उडवीची उत्तरे दिली . तसेच आज अखेर पर्यंत गाड्या परत न करता फिर्यादीची अडीच लाख रुपयांची फसवणूक केली आहे.











































