भाड्याने घेतलेला कॅमेरा परत न करता फसवणूक

0
232

काळेवाडी, दि. १७ (पीसीबी) – भाड्याने घेतलेला कॅमेरा आणि इतर साहित्य परत न करता दोन लाख 46 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 15 ऑक्टोबर रोजी काळेवाडी येथे घडला.

दत्तात्रय तुकाराम येवले (वय 36, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सय्यद मोहम्मद झिबिउल्ला (वय 27, रा. वाघोली) आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा कॅमेरा भाड्याने देतात. आरोपींनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने कॅमेरा, दोन लेन्स, बॅटरी, चार्जर, बॅग आणि मेमरी कार्ड असा दोन लाख 46 हजारांचे साहित्य फिर्यादींकडून भाड्याने घेतले. ते वेळेत परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.