भाड्याने खोली पाहण्यासाठी गेले आणि घडलं भलतंच; नेमकं प्रकरण काय ?

0
70

हिंजवडी, दि. 28 (पीसीबी) : भाड्याने राहत असलेला व्यक्ती त्याच्या खोलीमध्ये दारू पिऊन पडला होता. दरम्यान खोली पाहण्यासाठी आलेल्या चौघांसोबत त्याने वाद घातला. या वादातून चौघांनी त्याला मारहाण केली असता दारू पिलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 22 ऑक्टोबर रोजी साळुंखे वस्ती, माण येथे घडली.

सतीश अर्जुन देडगे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी घरमालक महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरी गणपती वाघमोडे, अविनाश रमेश गव्हाळे, विपुल सुरेश कुंभार (तिघे रा. थेरगाव), संदीप कांतीलाल शेडगे (रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश देडगे हा फिर्यादी यांच्या खोलीमध्ये भाड्याने राहत होता. तो 22 ऑक्टोबर रोजी दारू पिऊन घरी आला. दरम्यान खोली भाड्याने हवी असल्याने आरोपी खोली पाण्यासाठी आले. खोली पाहण्यासाठी गेल्यानंतर सतीश याने त्यांच्यासोबत वाद घातला. या वादातून चौघांनी सतीश याला मारहाण केली. या मारहाणीत सतीश याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.