भाडेतत्त्वावर नेलेली कार परस्पर विकून फसवणूक

0
132

भाडेतत्त्वावर नेलेली कार मालकाच्या परस्पर विकून कार मालकाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ऑक्टोबर 2023 मध्ये खेड तालुक्यातील महाळुंगे येथे घडला.

याप्रकरणी मयूर सिराज शेख (वय 31, रा. महाळुंगे, ता. खेड) यांनी एमआयडीसी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश कृष्णा सांगळे (वय 29, रा. नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीची स्कॉर्पिओ कार आरोपीने दरमहा 30 हजार रुपये भाडेतत्त्वाने चालविण्यासाठी नेली. त्याबाबत आरोपीने फिर्यादी सोबत करारनामा केला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांची कार नेऊन ती फिर्यादी यांच्या परस्पर लक्ष्मण गुरुलिंग कुंभार यांना विकली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.