भाडेकरू तरुणीला त्रास दिल्याचा जाब विचारल्याने मारहाण

0
93

महाळुंगे, दि. 23 (पीसीबी) : भाडेकरू तरुणीला त्रास देणाऱ्या तरुणाला मालक महिलेने जाब विचारला. त्या कारणावरून चौघांनी घरमालक महिला आणि तिच्या मुलाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 22) दुपारी दीड वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडली.

याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल सोनवणे, सागर सोनवणे आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भाडेकरू तरुणीला समोरील इमारतीमध्ये राहणारा भाडेकरू तरुण त्रास देत होता. त्याबाबत तरुणीने त्याला जाब विचारला. दरम्यान फिर्यादी आणि त्यांचा मुलगा घरासमोर आले. त्यावेळी आरोपी महिलांनी फिर्यादी सोबत वाद घातला. फिर्यादी यांचा मुलगा वाद सोडवीत असताना अनिल सोनवणे याने फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला मारहाण करून जखमी केले. सागर सोनवणे याने देखील फळी आणि विटेने मारहाण करून दुखापत केली. या भांडणात फिर्यादीच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत तुटून गहाळ झाली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.