भाडेकरूंना कोयत्याने मारहाण

0
93

हिंजवडी, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) – तुम्ही भाडेकरू आहात, तुम्हाला लय माज आलाय, असे म्हणून चार जणांनी दोघांना मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 4) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शिवबा चौक, सुसगाव येथे घडली.चंगु चांदेरे, मंगु चांदेरे, आदित्य चांदेरे आणि अविनाश चांदेरे (सर्व रा. सूस, ता. मुळशी, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल दालेल्या आरोपींची नावे आहेत. शिवतेज बाळू पवार (वय 18, रा. पाखरेवस्ती, सुसगाव) यांनी याबाबत सोमवारी (दि. 5) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवतेज आणि त्याचा मित्र राहूल सुभाष राठोड हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. ते शिवबा चौक, सुसगाव येथे आले असता आरोपींनी त्यांची दुचाकी अडविली. तुम्ही भाडेकरू आहात. तुम्हाला लय माज आलाय, असे म्हणत आरोपी आदित्य याने फिर्यादी शिवतेज याच्या डोक्यात व पाठीत उलटा कोयता करून मारहाण करीत गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.