चिखली, दि. २२ (पीसीबी) – भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेलेल्या १६ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी घरकुल चिखली येथे घडली.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जितेश रमेश इंगळे (वय 20, रा. गुळवे वस्ती, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 16 वर्षीय मुलगी शनिवारी दुपारी बारा वाजता भाजी आणण्यासाठी घराबाहेर गेली होती. घरकुल येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर आल्यानंतर आरोपीने मुलीचा पाठलाग केला. आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीवर प्रेम असल्याचे सांगत तिचा हात पकडून गैरवर्तन करत विनयभंग केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.










































