भाजप JDU शिवाय सरकार स्थापन करणार ?

0
1

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यात भाजपप्रणित एनडीए आघाडी शानदार विजय मिळवताना दिसत आहे. या निकालात भाजप सध्या 94 जागांवर आघाडीवर आहे. तसेच एनडीएचे 200 पेक्षा जास्त उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे आता बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत चर्चा रंगली आहे. नितीश कुमार यांचे नाव पुढे येत आहे. मात्र भाजपला JDU शिवाय सरकार स्थापन करण्याची संधी निर्माण झाली आहे. हे नवीन समीकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.
भाजप जेडीयूशिवाय सरकार स्थापन करणार?

भारतीय जनता पार्टी सध्या 94 जागांवर आघाडीवर आहे. आता भाजप नितीश कुमार यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करू शकते. जेडीयूशिवाय एनडीएचा बहुमताचा आकडा 122 वर पोहोचला आहे. भाजप 94 जागांवर, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) 19 जागांवर, जीतन राम मांझी यांचा HUM 5 जागांवर आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा 4 जागांवर आघाडीवर आहे. हा आकडा 122 आहे, जो बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे भाजप नितीश कुमार यांच्याशिवाय बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यास सक्षम आहे. मात्र आता पक्ष याबाबत काय निर्णय घेतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बिहाप विधानसभेत भाजप आणि जेडीयूने प्रत्येकी 101 जागा लढवल्या होत्या, ज्यामध्ये भाजप 94 जागांसह मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तर जेडीयूचे उमेदवार 82 जागांवर आघाडीत आहे. जेडीयू दुसऱ्या स्थावावर असला तरी मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार हे दावा करण्याची शक्यता आहे. मात्र भाजपला मुख्यमंत्रीपद हवे असेल आणि नितीश कुमार यासाठी तयार नसल्यास भाजप जेडीयूशिवाय सत्ता स्थापन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

NDA कडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा नाही
बिहार निवडणुकीसाठी महाआघाडीने तेजस्वी यादव यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषित केले होते, मात्र NDA कडून नितीश कुमार किंवा इतर कोणत्याही नेत्याच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा केली नव्हते. जेव्हा मुख्यमंत्री कोण होईल असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा एनडीएने निवडणूक जिंकली तर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडला जाईल असं उत्तर भाजपच्या नेत्यांनी दिले होते. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.