भाजप विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठा खेळी

0
15

दि. २७(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने राष्ट्रवादीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. आतापर्यंत 22 नगरसेवक गळाला लावले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात पूर्ण लक्ष घातले आहे. दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट, मनसे मिळून भाजप समोर तगडे आव्हान निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न आहे. खुद्द अजित पवार त्यासाठी तळ ठोकून असून जेष्ठ नेते आझम पानसरे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र करुन भाजपासमोर आव्हान देण्याची तयारी केली जात आहे.