भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी अनुप मोरे

0
267

दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) – भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निगडी येथील अनुप मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथील बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी आज मोरे यांच्या नावाची घोषणा केली.

यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री व युवा मोर्चा प्रदेश प्रभारी विक्रांतजी पाटील, माधवी ताई नाईक, नवनियुक्त भाजपा प्रदेश सचिव राहुल भैय्या लोणीकर, युवा मोर्चा प्रदेश महामंत्री निखीलजी चव्हाण, बादल कुलकर्णी, योगेशजी मैंद, सुदर्शनजी पाटसकर उपस्थीत होते.