पिंपरी दि. ७ (पीसीबी) – मोहन नगर परिसरात राहणारे आणि स्थापने पासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे जुने कार्यकर्ते गणेश अंबिके यांनी आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
गणेश अंबिके यांनी राष्ट्रीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महासचिव म्हणुन 10 वर्षे काम केले आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या फॉरेन अफेअर कनव्हेनर या पदावर कार्यरत होते. ते सोडून त्यांनी आज भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला.
आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, जिल्हा अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे तसेच चिंचवड विधानसभा प्रभारी शंकरशेठ जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम संपुर्ण शहरभर वाढविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे या प्रवेश प्रसंगी गणेश अंबिके यांनी सांगितले.