भाजप पदाधिकाऱ्याची मस्ती, कार डॅशबोर्डवर 500 अन् 200 च्या नोटांचे बंडल फेकले

0
3

दि . 6 ( पीसीबी ) – राज्यात संतोष देशमुख हत्याप्रकरण तापलं असतानाच शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला आहे. यात भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने त्याच्या काही साथीरांसह ही मारहाण केली असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सतीश भोसले हे भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मुंडेंप्रमाणे धसदेखील अडचणीत आलं असल्याचे बोललं जात आहे. अशातच, भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसलेचा एका धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. कारच्या डॅशबोर्डवर कारच्या 500 अन् 200 च्या नोटांचे बंडल फेकताना भोसले दिसत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यापूर्वी त्यांनी मारहाणीचा व्हिडीओ शेअर करत सरकारला प्रश्न उपस्थित केले होते. हे काय आहे काय? गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे. हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का? बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पाहा. अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे त्यांनी म्हटले होते.

अंजली दमानिया यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, हाच तो सतीश भोसले? कोण आहे हा? कुठून आले एवढे पैसे? अटक करा या माणसाला, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दमानिया यांनी मारहाणीचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सुरेश धस यांनी स्वतः व्हिडीओ दुजोरा दिला आहे. त्याचा मारहाणीचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो व्हिडीओ मी पाहिला आहे. त्यानंतर मी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांना फोन केला आणि त्यांना विचारलं की हा काय प्रकार आहे? त्यानंतर मला माहिती मिळाली की ही एका साखर कारखान्याच्या परिसरात घडलेली घटना आहे. ऊसतोड मजुराच्या घरातील महिला अथवा मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर ती घटना घडली होती. ती दिड वर्षांपूर्वीची घटना आहे. मात्र या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यानंतर मी पोलिसांना स्पष्ट सांगितलं की, मारहाण करणारा माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्याविरोधात तक्रार आली तर ती तक्रार घ्या आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे त्यांनी म्हटले आहे.