भाजप नेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा – शहर काँग्रेस पदाधिकारी.-काँग्रेस पदाधिकारी शिष्टमंडळाची अतिरिक्त पोलीस आयुक्त कडे मागणी

0
107

पिंपरी दि. १९ – या आठवड्यात सातत्याने काँग्रेस नेते आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या जीविताला धोका निर्माण करणारे वक्तव्य भाजप नेत्यांकडून सातत्याने केली जात आहेत. भाजप नेते तरविंदर सिंग मारवा, शिंदे सेनेचा आमदार संजय गायकवाड, भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे, रेल्वे राज्यमंत्री रोहित सिंग बिट्टू आणि यूपी सरकारचे मंत्री रघुराज सिंग यांच्या नुकत्याच झालेल्या पाच वक्तव्यांचा दाखला देत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने आज अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. वसंत परदेशी यांची भेट घेत संबंधित गुन्हेगार भाजप नेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करत गुन्हे दाखल न झाल्यास शहरभर सातत्याची विविध आंदोलने करणार असल्याबाबतचा इशारा देखील दिला आहे.

याबाबत डॉ.वसंत परदेशी यांनी वरिष्ठांशी बोलून तात्काळ निर्णय घेऊ असे आंदोलक कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

याप्रसंगी या काँग्रेस पदाधिकारी शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या निगारताई बारस्कर, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सौ. सायलीताई नढे, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. उमेश खंदारे, किरण नढे आणि आबासाहेब खराडे यांचा समावेश होता.