भाजप नेते किरीट सोमय्यांनी पाच महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप

0
126

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) : भाजप नेते किरीट सोमय्यांनी समोर यावं असं खुलं आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलंय. भाजप नेते किरिट सोमय्यांविरोधात तक्रार करण्यासाठी 5 महिला पुढे आल्यात. किरीट सोमय्यांनी शोषण केल्याचा आरोप या महिला करत असल्याचा खळबळजनक खुलासाही राऊतांनी केलाय. मात्र आम्ही राजकाऱण कुटुंबापर्यंत नेत नाही अशा शब्दांत राऊतांनी सोमय्यांना इशारा दिलाय. तर संजय राऊत यांनी 37 आरोप केले मात्र एकही पुरावा दिला नाही असा पलटवार किरीट सोमय्या यांनी केलाय.

मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्याच नेत्यांना कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कनाल या शिंदे गटाच्या नेत्यांची नावं घेत राऊतांनी हा आरोप केलाय. या नेत्यांची नावं घेण्याची हिम्मत ईडी आणि किरोट सोमय्यांमध्ये आहे का असा सवाल राऊतांनी विचारलाय.. घोटाळा केलाच तर हिशेब तर द्यावाच लागणार असा पलटवार किरीट सोमय्यांनी केलाय.

दरम्यान, संजय राऊत यांचा भाऊ संदीप राऊत हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झालेत. कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. कोविड काळात कोणत्याही प्रकारची कागदपत्रं तयार केली जात नव्हती. राजीव साळुंखे माझ्याकडे आले त्यांनी किचन देण्याची विनंती केली. पैसे घेत नव्हतो तरी त्यांनी बँक अकाऊंटमध्ये पैसे पाठवले असं संदीप राऊत म्हणालेत.