भाजप दोन ‘त्या’ आमदारांना एअर लिफ्ट करून आणणार

0
341

पिंपरी दि. ९ (पीसीबी) – राज्यसभा निवडणूक उद्या १० तारखेला होणार आहे. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठी चुरस लागणार हे स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी आप आपल्या पक्षांनी आपले आमदार मुंबईतील हाॅटेलमध्ये ठेवले आहेत. तर चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याने ते हाॅटेल ताजमध्ये नाहीत. त्यांना एअर लिफ्ट करून मुंबईत आणले जाणार आहे.

पुण्यातील दोन्ही आमदारांना एअर लिफ्ट करुन त्यांना मुंबईत आणण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे. शिवसेना उमेदवार संजय पवार आणि भाजप आमदार धनंजय महाडिक यांच्यात रस्सीखेच आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. उद्या निवडणूक असल्याने सर्वच पक्षांचे धाबे दणाणले आहे. उद्याच्या मतदानाचे नियोजन करण्यासाठी अथवा अपक्ष आमदार आपल्याकडे वळवण्यासाठी सत्ताधारी आघाडी आणि भाजप यांच्यात मोठी चुरस लागली आहे.

दरम्यान, अशातच भाजपच्या २ आमदारांची तब्येत नाजूक असल्याने त्यांना मतदानासाठी कसे आणायचे, असा सवाल भाजपसमोर होता.परंतु. या दोन्ही आमदारांना विधानभवनात आणण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे. व्हीलचेअरवरुन हे दोन्ही आमदार मतदानासाठी येणार आहेत.
जगताप यांना एअर अँम्बुलन्सने विधानभवनात आणण्यात येणार आहे, तसेच, टिळक सध्या मुंबईतच असल्याची माहिती आहे.