भाजप जिंकला तर उद्धव ठाकरे हे लवकरच तुरुंगात दिसतील

0
171

नवी दिल्ली: शुक्रवारी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आपच्या कार्यालयात पहिली पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणावरही वक्तव्य केले आहे. निवडणुकीत जर भाजप जिंकला तर उद्धव ठाकरे हे लवकरच तुरुंगात दिसतील असा खळबळजनक दावा केजरीवालांनी केला आहे.

हेमंत सोरेन यांनीही राजीनामा द्यायला नको होता
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, हेमंत सोरेन यांनीही राजीनामा द्यायला नको होता, त्यांनी तुरुंगातून सरकार चालवायला हवं होतं. अशा परिस्थितीत ते जिथे-जिथे निवडणूक हरतील तिथे त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकतील आणि सरकार पाडतील. आज मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही, कारण मी या हुकूमशाहीविरोधात संघर्ष करत आहे.

अडवाणींप्रमाणे भाजप मोदींना निवृत्त करणार?
अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होतील. लालकृष्ण अडवाणींप्रमाणे भाजप त्यांना निवृत्त करणार का? ही निवडणूक भाजपने जिंकल्यास मोदी अमित शाह यांना पंतप्रधान करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना सरकार स्थापनेनंतर दोन महिन्यांत पदावरून हटवलं जाईल.