भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबतच युती मान्य नाही

0
68

महाराष्ट्र, १७ जुलै (पीसीबी) – भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबतच युती मान्य नाही असं संघाशी संबंधित साप्ताहिक विवेकमध्ये म्हटले आहे. ‘भाजप कार्यकर्ता हा खचलेला नाही तर संभ्रमात असल्याचं देखील या लेखात म्हटले आहे. हिंदुत्व हा सामायिक दुवा शिवसेनेसोबत युती करणे हे कार्यकर्त्यांनी स्वीकारले आहे. मात्र हीच भावना राष्ट्रवादीसोबत आल्यावर टोकाला गेली. लोकसभेमुळे या नाराजीत भर पडली आहे. कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण पण ते केवळ हिमनगाचे टोक. कार्यकर्त्यांतून नेता घडण्याची नैसर्गिक प्रक्रिया, जे भाजपाचे सर्वांत मोठे बलस्थान आहे ती प्रक्रियाच पुढील काळात दुर्मीळ होत जाईल की काय अशी शंका कार्यकर्त्यांच्या मनात आहे. ‘

‘हिंदुत्वविरोधकांनी सोशल मीडियावरून यशस्वीपणे चालवलेला नॅरेटिव्ह देखील एक कारण आहे. कारण भाजप हा आयातांचा पक्ष बनत चालला आहे. भाजप ’वॉशिंग मशीन’ आहे, भाजपाचा मूळ कार्यकर्ता केवळ सतरंजी उचलण्यापुरताच आहे, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न विरोधकांनी केला.’ असं देखील या लेखात म्हटलं आहे. सोशल मीडियावर हिंदुत्वाची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ मंडळींबाबत जो प्रकार अलीकडे केला त्यामुळे अस्वस्थतेला बळ मिळाले आहे. यामुळे चुकीचा संदेश गेला आहे. असं विवेकच्या लेखात म्हटले आहे.
‘कार्यकर्त्या निवडणुकीत मागे पुढे झालं की थोडा विचलीत होते. कार्यकर्ता आता कामाला ही लागला आहे.’ असं प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

‘विवेकच्या आधी ऑर्गनायझरमध्ये असा लेथ वाचला होता. याच्यामागे कोणती विचारधारा याचा शोध घ्यावा लागेल.’ असं शरद पवारांनी म्हटले आहे. ‘सगळे भ्रष्ट लोकं अजित पवार नाही एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक असो. सगळे लोकं सोबत घेतल्याने भाजप आणि आरएसएस भ्रष्ट आणि बदनाम झाली आहे.’ असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.‘आरएसएसने आरोप केलाय की शेती मंत्रालयात भ्रष्ठाचार झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत त्यांनी पोहोवली. पण याचं पुढे काय झाले हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे.