- -भारताची लोकशाही ही रशियन मार्गाने
ज्या प्रकारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय नॅशनलिस्ट विचारसरणीचे होते. देशात राष्ट्रीय विचारसरणीच्या व्यक्तींना भाजप आणि काँग्रेस यांचा संयुक्त विरोध असतो. त्यामुळेच काँग्रेस आणि भाजप नेहमीच प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात असल्याचे चित्र आपण पाहता, त्यात त्यांच्या संकुचित विचारधारेचा परिणाम असल्याचे मत वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. अकोल्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
देशात एकाचवेळी लोकसभा निवडणुका घेण्याची गरज होती. तितक्या ईव्हीएम उपलब्ध आहेत, तितका स्टाफ आहे, तितकी सुरक्षा यंत्रणा आहे. इतक्या टप्प्यात निवडणुका होणे हे कुठेतरी ‘बनवाबनवी’ होत असल्याचा संशय निर्माण करते, असा दावा आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. यातून लोकशाही व्यवस्था खिळखिळी करण्यात येत असून, भाजप उमेदवारांच्या विजयासाठी हे सर्व होत असल्याचा संशय आंबेडकर यांनी व्यक्त केला. विविध लोकसभा मतदारसंघांत भाजप आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात होत असलेला निवडणुकीतील सामना कितपत गंभीरतेने लढला जात आहे, असा सूचक इशारा आंबेडकर यांनी आज दिला आहे.
देशात बॅन (प्रतिबंधित) असलेल्या औषध उत्पादकांकडून भाजपने इलेक्टोरल बाँडचा पैसा उभारल्याचा गंभीर आरोप वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एकीकडे इलेक्टोरल बाँडचा पैसा जमा करत या बॅन असलेल्या औषधांचा साठा दुसरीकडे खुला केला गेला, तो विकला गेल्याचा गंभीर आरोप वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. ती बॅन (प्रतिबंधित) औषधे खुली करत भाजपने इलेक्टोरल बाँडचा निधी जमा करणे हे कदापि लोकाहिताचे नाही.
त्यामुळे आता इलेक्टोरल बाँड हा लोकांचा इशू होत आहे. भाजपला मी सजग करतो. फूड अँड ड्रग्ज विभागाने बॅन केलेल्या मेडिसीन बाजारात आले कसे. त्या कंपन्यांना इलेक्टोरल बाँड विकल्या गेले कसे. भाजपच्या विरोधात उद्या याविषयीचे सविस्तर विश्लेषण बाहेर आल्यावर भाजप आणि RSS हे ‘मौत का सौदागर’ ठरतील, असा गंभीर आरोप वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
‘मौत का सौदागर’ या वाक्यप्रचारासाठी भाजपने तयार राहावे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. बॅन मेडिसीन मानवी वापरासाठी नव्हते. समाजात अचानक माणसाचा मृत्यू ही मोठी चिंतेची बाब समोर येत आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. ती राजकीय पक्षांची लढाई राहिली नाही, असा दावाही आंबेडकर यांनी केला.
भारताची लोकशाही धोक्यात आहे. अशी ओरड भाजप सोडून सर्वच राजकीय पक्ष करतात, असा दावा करताना भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार हुकूमशाहीचा आरोप लावला जातो. ईडी, सीबीआय आणि इतर एजन्सींचा वापर करत विरोधकांना नामोहरम करण्याचा एकही चान्स भाजप सोडत नाही. देशात मुख्यमंत्री पदावर असलेले दोन दोन मुख्यमंत्री हे जेलमध्ये टाकण्यात येतात. निवडणुका सुरू असताना काँग्रेसची आर्थिक नाकेबंदी केली जाते. अशा वेळी देशात लोकशाही व्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.
या सर्व परिस्थितीवर भाष्य करताना वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर संकेत देत भारताची लोकशाही ही रशियन मार्गाने पुढे चालली काय, असा संशय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिला जात आहे. ज्या प्रकारे रशियामध्ये विरोधकांचा आवाज दाबला जातो. विरोधी नेंत्याना जेलमध्ये टाकले जाते. तशीच परिस्थितीत भारतात आहे. ही परिस्थिती धोकादायक असल्याचे मत वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. प्रकाश आंबेडकर हे संविधान निर्माता भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून, ते ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. त्यांच्याकडे देशातील मोठे बुद्धिजीवी म्हणून पाहिले जाते. भारताची लोकशाही रशियाच्या मार्गावर जाण्याची त्यांनी व्यक्त केलेली शंका, भीती ही निश्चित गंभीर अशाच स्वरूपाची आहे.












































